New Concept for Social Distancing : आता मिशन ‘छत्री खोल दे, करोना भगा दे’…

New Concept for Social Distancing: Now the mission is to open the umbrella, drive away the corona ... सब टीव्हीवर प्रसारित होणा-या 'भाकरवडी' या मालिकेच्या टीमने एक नवीन युक्ती शोधून काढली आहे. ज्यात सर्वजण छत्र्यांच्या मदतीने एकमेकांपासून अंतर ठेवताना दिसत आहेत.

एमपीसी न्यूज – करोनाच्या साथीमुळे मनोरंजन क्षेत्रातील सर्व शूटिंग मागील तीन महिने बंद होती. मात्र आता काही अटी पाळून विविध मालिकांच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे.  यासाठी प्रत्येकजणाला मास्क अनिवार्य आहे, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्स देखील सांभाळले गेले पाहिजे ही अट आहे. मग सोशल डिस्टन्स कसे ठेवायचे यावर प्रत्येकजण आपापल्या परीने शक्कल लढवत आहे.

सब टीव्हीवर प्रसारित होणा-या ‘भाकरवडी’ या मालिकेच्या टीमने एक नवीन युक्ती शोधून काढली आहे. ज्यात सर्वजण छत्र्यांच्या मदतीने एकमेकांपासून अंतर ठेवताना दिसत आहेत. ‘भाकरवडी’ या मालिकेचे निर्माते जेडी मजेठिया यांनी अलीकडेच आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन ही अनोखी शक्कल लढवून एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे.

यात ‘भाकरवडी’च्या सेटवर उपस्थित असलेले सर्व सदस्य छत्री घेऊन दिसत आहेत. हातातली छत्री प्रत्येकाला एकमेकांपासून नियमित अंतर ठेवण्यास मदत करत आहे. त्याचबरोबर सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे ही शक्कल सयुक्तिकपण वाटत आहे.

व्हिडिओ शेअर करताना जेडी यांनी लिहिले, ‘प्रेक्षकच नाही तर आम्ही आमच्या कलाकारांसह प्रत्येकाची काळजी घेतोय. सर्वजण योग्य ती सावधगिरी बाळगत सेटवर उपस्थित  आहोत. ही अनोखी कल्पना आपल्याला एकमेकांपासून दूर ठेवण्यास मदत करेल’. ही अनोखी कल्पना अन्य कलाकार आणि निर्मात्यांनींही वापरावी असा सल्ला जेडी मजेठिया यांनी दिला आहे. तसेच ही पद्धत इतर क्षेत्रांमध्ये काम करणार्‍यांनाही उपयोगी ठरू शकते, असेही ते म्हणाले आहेत.

सब टीव्हीवरील ‘भाकरवडी’चे शूटिंग शुक्रवारपासून सुरु झाले असून ही एका गुजराती कुटुंबाची कहाणी आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.