Pune : नवनिर्वाचित आमदार मुक्ता टिळक, चेतन तुपे आणि सुनील टिंगरे यांचे सर्व पक्षीय नगरसेवकांकडून अभिनंदन

एमपीसी न्यूज – नवनिर्वाचित आमदार मुक्ता टिळक, चेतन तुपे आणि सुनील टिंगरे यांचे आज महापालिकेच्या सभागृहात सर्वपक्षीय नगरसेवकांकडून अभिनंदन करण्यात आले. महापौर कार्यालयात टिळक यांचे अभिनंदन करण्यात आले.

वडगावशेरी आणि हडपसर या भाजपच्या 2 मतदारसंघांत पराभव करून राष्ट्रवादीने विजय मिळविला. तर, कसबा मतदारसंघात महापौर मुक्ता टिळक यांनी, पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे यांनी, तर शिवजीनगरमध्ये ‘पीएमपीपीएमएल’चे संचालक सिद्धार्थ शिरोळे यांनी विजय मिळविला.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 8 ही मतदारसंघांत विजय मिळविला होता. यावेळी हडपसर आणि वडगावशेरी मतदारसंघांत राष्ट्रवादीने विजय मिळविला. तर, 4 मतदारसंघांत भाजपला निसटता विजय मिळाला. 2 मतदारसंघांत भाजपचे मताधिक्यात घट झाली आहे. आगामी महापालिका निवडणुकीत काँग्रेस – राष्ट्रवादीला फायदा होणार असल्याची चर्चा सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.