New Corona strain Patient :  नव्या स्ट्रेनची बाधा झालेला ‘तो’ तरुण स्वगृही विलगीकरणात !

एमपीसी न्यूज : ब्रिटनमधून भारतात परतलेल्या आणि कोरोना टेस्टमध्ये नवीन स्ट्रेन बाधित पुण्यातील ‘तो’ तरुण 28 दिवसासाठी स्वगृही विलगीकरणात असल्याची माहिती आरोग्य विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली.

कोरोना विषाणुने स्वत:च्या रचनेत, प्रतिकारशक्तीत बदल (म्यूटेशन) केल्यामुळे कोरोनाच्या नव्या स्ट्रेन विषाणुने ब्रिटनमध्ये थैमान घातले आहे. त्या पार्श्वभुमीवर ब्रिटन, युरोप खंडातील देशांमधून लाखो निवासी व अनिवासी भारतीय नागरीक मायदेशी परतू लागले आहेत.

दरम्यान, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ब्रिटनमधून परतलेल्या महाराष्ट्रातील 8 प्रवाशांमध्ये नवीन कोरोनाची लक्षणे आढळून आली असून त्यातील मुंबईतील 5 जण तर उर्वरीत पुणे, ठाणे आणि मीरा भाईंदर मधील प्रत्येकी एक जणांचा समावेश आहे. हे सर्व जण विलगीकरणात असून त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू आहे, अशी माहिती दिली.

त्यापैकी पुण्यातील मूळनिवासी तो युवक (वय 28) 26 डिसेंबर रोजी ब्रिटनहून पुण्यात आला होता. कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली तरी त्याला विममानतळावरून थेट एका रुग्णालयात विलगीकरणात ठेवले गेले. त्यानंतर 14 व्या दिवशी आरटीपीसीआर कोरोना टेस्टमध्ये त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे डिस्चार्ज देण्यात आला होता.

परंतु खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभागाकडून सर्व परदेशातून आलेल्यांचे स्वॅब सीरम आणि एनआयव्हीकडे पाठविण्यात आले होते. त्यामध्ये या तरुणाचा नव्या स्ट्रेनचा रिपोर्ट पॉजिटिव्ह आल्यामुळे त्याच्या राहत्या घरी 28 दिवसांकरीता विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. दरम्यान त्याच्या संपर्कात आलेल्यांचा शोध (कॉन्टॅक्ट ट्रेसिंग) घेतला जात आहे. परंतु त्याच्या कुटुंबियांची टेस्ट निगेटिव्ह आल्यामुळे काळजी करण्याचे कारण नसल्याचे मत आरोग्य विभागातील सूत्रांनी दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.