India Corona Update : कोरोनाचा नवा व्हेरिंट डेल्टापेक्षा भयंकर, देशात गेल्या 24 तासांत 8,318 नवे कोरोना रुग्ण 

एमपीसी न्यूज – दक्षिण आफ्रिकेत कोरोना विषाणूचा B.1.1.529 हा नवा व्हेरिंट समोर आला आहे. हा व्हेरिंट कोरोनाच्या डेल्टा व्हेरिंट पेक्षा भयंकर असून, याचा संसर्ग अधिक वेगाने होण्याची शक्यता वैज्ञानिकांनी वर्तवली आहे. तसेच, यामुळे रुग्णांमध्ये गंभीर स्वरुपाची लक्षणे दिसू शकतात असे वैज्ञानिकांचे मत आहे. दरम्यान, भारतात गेल्या 24 तासांत 8 हजार 318 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. 

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने ‘एएनआय’ने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, भारतातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 45 लाख 63 हजार 749 एवढी झाली आहे. त्यापैकी 3 कोटी 39 लाख 88 हजार 797 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात गेल्या 24 तासांत 10 हजार 967 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशाचा रिकव्हरी रेट वाढून 98.34 टक्के एवढा झाला आहे.

 

देशातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्येत घट होत असून, सध्या 1 लाख 07 हजार 019 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.देशात गेल्या 24 तासांत 465 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून, कोरोनामुळे देशात आजवर 4 लाख 67 हजार 933 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.32 टक्के एवढा झाला आहे.
आयसीएमआर’च्या आकडेवारीनुसार देशात आजवर 63.82 कोटी चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत देशात आत्तापर्यंत 121.06 कोटी नागरिकांना लस टोचण्यात आली आहे.
या आठवड्याच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेत कोरोना विषाणूचा नवा व्हेरिंट समोर आला. 100 रुग्णांमध्ये हा व्हेरिंट आढळून आला आहे. कोरोनाच्या डेल्टा व्हेरिंट पेक्षा हा भयंकर असून, यामध्ये दहा वेगवेगळ्या प्रकारचे म्युटेशन समोर आले आहे. भारत सरकारने दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांचे काटेकोर स्क्रिनिंग करण्याची सूचना केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.