New Covid Guideline : नव्या व्हेरिएंटमुळे राज्यात पुन्हा निर्बंध ; मास्क नसल्यास दंड, सार्वजनिक कार्यक्रमांना 50 टक्के उपस्थितीला परवानगी

एमपीसी न्यूज – दक्षिण आफ्रिकेत आलेल्या नव्या व्हेरिएंटमुळे नवा धोका निर्माण झाला असून, खबरदारी म्हणून महाराष्ट्र राज्यात पुन्हा नव्याने निर्बंध लागू करण्यात आले आहेत. नव्या नियमानुसार सार्वजनिक ठिकाणी कोरोना नियमांचे पालन न केल्यास तसेच मास्क नसल्यास 500 रूपये एवढा दंड आकारला जाणार आहे. तसेच, सार्वजनिक कार्यक्रम, थिएटर, नाट्यगृह, मनोरंजन कार्यक्रमाला 50 टक्के उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे. 

असे आहेत नवीन नियम

– सार्वजनिक ठिकाणी किमान 6 फूट अंतर राहील असं सोशल डिस्टेंसिंगचं पालन करावं
– रिक्षा, टॅक्सी, बस, कॅबमध्ये लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच प्रवास करता येईल. म्हणजे यापुढे सार्वजनिक अथवा खासगी वाहनात केवळ पूर्ण लसीकरण झालेल्यांनाच प्रवेश मिळणार आहे. लस घेतली नसेल तर प्रवास करता येणार नाही
– महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना पूर्ण लसीकरण असलेले प्रमाणपत्र किंवा प्रवासाच्या 72 तास आधीचा आरटी पीसीआर चाचणी रिपोर्ट देणे बंधनकारक
-सिनेमा हॉल, लग्नाचे हॉल, सभागृह याठिकाणी क्षमतेच्या 50 टक्के लोकांनाच उपस्थित राहता येईल

– मास्क घातलेला नसेल तर 500 रुपये दंड
– दुकानात ग्राहकाकडे मास्क न घातल्यास दुकानदाराला 10 हजार दंड, तर मॉलमध्ये कुणी मास्क न घातल्यास मालकाला 50 हजार दंड
– राजकीय सभा, कार्यक्रमात कोविड नियमांचे उल्लंघन केल्यास 50 हजार दंड
– सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास सक्त मनाई
– टॅक्सी किंवा खासगी वाहनात मास्क न घातल्यास 500 रुपये दंड तसेच वाहन मालकासही 500 रुपये दंड ठोठावण्यात येईल
– भारत-न्यूझीलंड मॅच पाहण्यासाठी केवळ 25 टक्के लोकांनाच उपस्थितीला परवानगी
– वारंवार हात स्वच्छ धुवावेत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.