New Delhi : देशात 24 तासात 1396 नवीन रुग्ण!; एकूण रुग्णांची संख्या 27892 वर

एमपीसी न्यूज – गेल्या 24 तासात देशभरात 381 लोकं बरे झाले असून आतापर्यंत 6184 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाचा रिकव्हरी रेट 22.17 टक्के झाला आहे. देशभरात 24 तासात 1396 नवीन रुग्ण आढळले आहेत त्यामुळे देशातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 27892 वर पोहचली असून सक्रिय रुग्णांची संख्या 20835 इतकी झाली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली.

देशातील 16 जिल्ह्यात गेल्या 28 दिवसात एकही रुग्ण आढळला नाही तर एकूण 85 जिल्ह्यांमध्ये गेल्या 14 दिवसांपासून एकही रुग्ण आढळलेला नाही. ‘रेड झोन‘मधून ऑरेंज झोन आणि यातून ग्रीन झोनमध्ये जाण्यासाठी प्रयत्न करणे, हा मुख्य उद्देश असल्याचे याऊ अग्रवाल म्हणाले. ही लढाई डाॅक्टर, रुग्ण आणि सरकार फक्त यांचीच नसून सर्व समाजाची आहे, असेही ते म्हणाले.

अग्रवाल पुढे म्हणाले, कोरोनामुक्त झालेला रूग्णांपासून संक्रमणाचा धोका नसतो त्यामुळे त्यांनी पुढे येऊन आपला प्लाझ्मा देऊन दुसऱ्या रुग्णांना बरे होण्यासाठी मदत करावी. तसेच ही वेळ कोरोना रूग्णांबरोबर उभे राहण्याची आहे कारण आपली लढाई कोरोना रोगाविरुद्ध असून रुग्णांशी नाही, असे ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. मुख्यमंत्र्यांना त्यांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केलं आहे. रेड झोन आणि ऑरेंज झोनमध्ये येणाऱ्या सर्व जिल्ह्यांमध्ये कठोरपणे कायद्याची अंमलबजावणी करुन ट्रान्समिशनची साखळी मोडली पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.