New Delhi : देशात 24 तासात 1543 नवे कोरोना रुग्ण, बाधितांचा आकडा 29,435 वर

एमपीसी न्यूज- देशात कोरोनाचे थैमान सुरूच आहे. गेल्या 24 तासात 1543 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 29,435 वर पोहोचला आहे. यापैकी 6,865 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर देशात सध्या 21,631 रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी दिली.

केंद्रीय आरोग्य आणि गृह मंत्रालयाच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. देशात गेल्या 24 तासात 684 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनातून बरे होणाऱ्यांचं प्रमाणदेखील वाढत आहे. देशाचा कोरोना रिकव्हरी रेट हा 23.3 टक्क्यांवर पोहोचला आहे, असं लव अग्रवाल यांनी सांगितलं. देशात रुग्ण दुप्पट होण्याचा दर 10.23 इतका झाला असून पूर्वी तो 3.25 होता. दरम्यान, कोरोनावर अद्यापही विशिष्ट असं औषध निघालेलं नाही. मात्र, प्लाझमा थेरपी संदर्भात संशोधन सुरु आहे, असंदेखील अग्रवाल यांनी सांगितलं.

‘आयसीएमआर’कडून हे स्पष्ट करण्यात आले की प्लाझ्मा थेरेपी हा कोणताही मान्यता प्राप्त उपाय नसून तो एक प्रयोग आहे. त्यामुळे या प्रणालीचा उपचारासाठी उपयोग करण्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही आहे. तसेच दिलेल्या दिशा निर्देशानुसार या थेरपीचा उपचार झाला नाही तर वेगळे परिणाम सुद्धा भोगावे लागू शकतात.

लव आग्रवाल पुढे म्हणाले, ज्यांना सौम्य किंवा अतिसौम्य लक्षणे आहेत त्यांच्यासाठी होम आयसोलेशनची नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. तसेच आपण एक अशी लढाई लढत आहोत ज्यामध्ये सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे.

जगात कोरोना मुक्त झालेल्या रुग्णापासून संक्रमण होण्याची कोणतीही घटना समोर आले नाही तसेच जे रुग्ण आरटि-पीसीआर नुसार उपचार घेऊन पूर्ण बरे झाले आहेत याबाबत शंका बाळगण्याचे कारण नाही, असे अग्रवाल यांनी स्पष्ट केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.