New Delhi : देशात 24 तासांत 1553 कोरोनाचे नवे रुग्ण तर, 36 जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – देशात गेल्या 24 तसात 1553 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे तर 36 रूग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 17,265 वर जाऊन पोहचली आहे. देशातील 23 राज्य आणि केंद्रशासित प्रदेश येथील एकुण 59 जिल्हे कोरोनामुक्त झाले आहेत. गोवा हे राज्य पूर्णपणे कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली.

देशात कोरोनाचे रुग्ण 7.5 दिवसात दुप्पट होत आहेत पुर्वी हा दर 3.5 दिवसांचा होता. आतापर्यंत कोरोनाचे 2546 रुग्ण पुर्णपणे बरी होऊन त्यांना घरी सोडण्यात आले आहे.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील 28 दिवसात पुडुचेरीतील माहे, कर्नाटकातील कोडागु आणि उत्तराखंडमधील मधील पौडी गढवाल मध्ये कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नाही.

गेल्या 14 दिवसांत ज्या जिल्ह्यांमध्ये एकही कोरोना रुग्ण आढळला नाही, अशा जिल्ह्यांची संख्या वाढून 59 झाली आहे. तसेच गोवा राज्य कोरोनामुक्त झाल्याचे देखील केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.

गृहनिर्माण मंत्रालयाचे सहसचिव श्रीवास्तव यांनी सांगितले, केंद्र सरकार लॉकडाऊनवर बारीक लक्ष ठेवून आहे. लॉकडाऊनचे नियम मोडल्यास योग्य ती कारवाई केली जात आहे. जेथे लॉकडाऊनचे नियम मोडले जात आहेत. अशा संबंधित राज्यांना सूचना केल्या जात आहेत.

ते म्हणाले की, सोमवारी केंद्रीय गृह मंत्रालयाने केरळ सरकारला पत्र लिहिले आहे. यात लॉकडाऊनबाबत जारी केलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचनांविषयी त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रसाशनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. दरम्यान आज (दि.20) पासून रेड झोन वगळता ऑरेंज व ग्रीन झोन जिल्ह्यामध्ये लाॅकडाऊनचे नियम शिथिल करून काही उद्योगधंद्यांना सूट देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे शहरात रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे या शहरात कडक निर्बंध घालण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.