New Delhi: देशात 24 तासांत 29 मृत्यू , 463 नवीन कोरोना रुग्णांची नोंद ; एकुण रुग्ण संख्या 10,815 वर

एमपीसी न्यूज – देशात लॉकडाऊनची मुदतवाढ होत असताना देखील रुग्णसंख्या वाढण्याचा दर कमी होताना दिसत नाही. गेल्या चोवीस तासात देशात 29 मृत्यू आणि 1463 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोना रुग्णांची संख्या 10,815 वर जाऊन पोहोचली आहे. यापैकी 9272 सक्रिय रुग्ण असून 1190 रुग्ण आतापर्यंत कोरोना मुक्त झाले आहेत. आज झालेल्या 29 मृत्यू सहित कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रूग्णांची संख्या 353 झाली आहे.

‘एनआयए’च्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात आज 350 नवीन रुग्णांची वाढ झाल्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 2684 वर जाऊन पोहोचली आहे, तसेच दिल्लीची एकूण रुग्ण संख्या 1510 झाली आहे. तमिळनाडूमध्ये 98 नवीन रुग्णांची नोंद झाल्यामुळे एकूण रुग्ण संख्या 1173 वर जाऊन पोहोचली आहे. मध्यप्रदेशमध्ये 126 नवीन रुग्णांची नोंद झाल्यामुळे एकूण रुग्ण संख्या 730 इतकी झाली आहे. संचारबंदीचे नियम कडक केल्यानंतर सुद्धा रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत आणखी वाढ झाली आहे.

सोमवारी सायंकाळपासून 29 मृत्यूची नोंद झाली. त्यापैकी 11 मृत्यू महाराष्ट्रात, मध्य प्रदेशात 7, दिल्लीतील 4, कर्नाटकमधील 3, आंध्र प्रदेशातील 2 आणि पंजाब व तेलंगणामधील प्रत्येकी 1 मृत्यूचा मृत्यू झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी देशाला उद्देशून केलेला संबोधनात लॉकडाऊन तीन मेपर्यंत वाढवण्याची घोषणा केली. इतर देशांच्या तुलनेत कोरोना या साथीच्या आजारांचा फैलाव रोखण्यासाठी आपण मोठ्या प्रमाणात यश मिळवळ्याचे त्यांनी सांगितले. या आजाराचा समूळ नायनाट करण्यासाठी आपल्याला हा लाॅकडाऊन तीन मे पर्यंत वाढवावा लागेल असे त्यांनी सांगितले. तसेच या साथीच्या आजारावर विजय मिळवण्यासाठी त्यांनी सोशल डिस्टन्सिंग व मास्कचा योग्य वापर करण्याचे आवाहान देखील जनतेला केले.

नरेंद्र मोदी यांनी भाषणाच्या शेवटी सर्व देशवासीयांकडून सप्तपदीचे वचन मागितले. या सप्तपदीमध्ये त्यांनी घरातील ज्येष्ठ लोकांची काळजी घेण्याचे तसेच संचार बंदीचे योग्य पालन करण्याचे आवाहन केले. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे, गरीब कुटुंबांना मदत करण्याचे व कोरोना सारख्या आजारावर उपचार करण्यासाठी मेहनत घेत असलेल्या आरोग्य कर्मचारी व इतर कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्याचे आवाहन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.