New Delhi : देशात 24 तासांत 3277 नवे रुग्ण; 127 जणांचा मृत्यू तर, एकूण रूग्ण संख्या 62,938 वर

एमपीसी न्यूज – गेल्या 24 तासांत भारतात 3 हजार 277 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 127 जणांचा कोरोना विषाणूने मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे 1 हजार 511 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या 41 हजार 472 रुग्णांवर उपचार सुरू असून 19 हजार 358 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या सर्वात मोठी आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 20 हजार 228 रुग्ण आढळले आहेत. तर 779 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. महाराष्ट्रा पाठोपाठ गुजरातमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सर्वात मोठी आहे. गुजरातमध्ये आतापर्यंत 7 हजार 796 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

मध्यप्रदेशमध्ये 3 हजार 614, उत्तर प्रदेशमध्ये 3 हजार 373, तेलंगाणामध्ये 1 हजार 163, राजस्थानमध्ये 3 हजार 708, झारखंडमध्ये 157, हरियाणामध्ये 675, बिहार 591, जम्मू काश्मीर 83, पंजाब 1 हजार 762, केरळ 508, उत्तराखंडमध्ये 67 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

देशात कोरोना रुग्णांचा दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी 24 मार्च पासून देशव्यापी लॉकडाऊन लागू करण्यात आला. लॉकडाऊन कालावधीत देखील कोरोना रुग्णांची संख्या कमी होण्याच्या मार्गावर नाही.

देशात कोरोना रुग्णांची संख्या आता 62 हजार 938 वर पोहोचली आहे. तर 2 हजार 109 रूग्णांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहे. त्यामुळे आता या कठीण प्रसंगी लॉकडाऊनच्या नियमांचे पालन होणे अत्यंत गरजेचं आहे.

लाॅकडाऊनचा तिसरा टप्पा येत्या 17 मे रोजी संपत आहे एकीकडे रुग्ण संख्या कमी होत नसल्याने सरकारची चिंता वाढली आहे तर 17 मेनंतर सरकार नक्की काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.