New Delhi: भारतात एका दिवसांत 97 नवे कोरोनाबाधित, एकूण संख्या 703 वर!

0

एमपीसी न्यूज – देशात आज नवीन 97 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. एका दिवसात एवढे रुग्ण वाढण्याची ही पहिलीच वेळ आहे. आतापर्यंत देशात एकूण 703 रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची संख्या 18 झाली आहे. 

कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग महाराष्ट्रात दिसून येत आहे. महाराष्ट्रात आज आठ नवीन कोरोनाबाधित रुग्ण सापडले तसेच कोरोनाबाधित मृतांचा आकडाही दोनने वाढला. महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 130 तर मृतांची एकूण संख्या 5 झाली आहे.

महाराष्ट्राच्या खालोखाल केरळमध्ये 110 तर कर्नाटकमध्ये 55 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. गुजरातमध्ये 42, उत्तरप्रदेश 40, राजस्थान 39, दिल्लीत 35, तेलंगणात 34 तर पंजाबमध्ये 33 केरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. कोरोनाबाधितांमध्ये 47 परदेशी नागरिकांचा समावेश आहे.

उपचारांनंतर 45 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यात महाराष्ट्रातील 18 जणांचा समावेश आहे.

HB_POST_END_FTR-A2
You might also like