New Delhi: देशातील सुमारे 30 टक्के कोरोनाबाधित ‘तबलीगी जमात’शी संबंधित- आरोग्य मंत्रालय

एमपीसी न्यूज : भारतात आतापर्यंत 14 हजार 378 लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी 4 हजार 291 म्हणजेच 29.8% पॉझिटीव्ह रुग्ण  दिल्ली निजामुद्दीन मरकज येथे झालेल्या तबलीगी जमात कार्यक्रमाशी संबंधित असल्याचे आढळून आले आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

तबलीगी जमात कार्यक्रमास उपस्थित राहिलेल्या देशभरातील एकूण 23 राज्ये आणि काही केंद्रशासित प्रदेशांमधील व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. यात सर्वाधिक तमिळनाडूमध्ये निजामुद्दीन मरकजमधील कार्यक्रमातील कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत.

दिल्लीतील निझामुद्दीन येथे तब्लिगी जमातचा कार्यक्रम पार पडला होता. हा कार्यक्रम देशातील अनेक भागात कोरोनाचा प्रसार करण्यात कारणीभूत ठरला असल्याची बाब समोर आली आहे. देशातील 14 हजार 378 कोरोनाबाधितांपैकी 4 हजार 291 केसेस या कार्यक्रमाशी संबंधित व्यक्तींमुळे झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

तामिळनाडूत हे प्रमाण सर्वाधिक म्हणजे 84 टक्के आहे तर तेलंगणात हेच प्रमाण 79 टक्के आहे. नवी दिल्लीत 63 टक्के रुग्ण हे तबलिगी जमातशी संबंधित आहेत. आंध्रप्रदेशमध्ये हे प्रमाण 61 टक्के तर उत्तरप्रदेशात 59 टक्के असल्याचे आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.