New Delhi : अंतराळात भारताचे ‘मिशन शक्ती’ यशस्वी ; तीन मिनिटात उपग्रहाचा वेध

एमपीसी न्यूज- भारताकडून क्षेपणास्त्राद्वारे एक उपग्रह पाडण्यात यश आले असून अशा स्वरुपाची कामगिरी करणारा भारत हा चौथा देश ठरल्याची माहिती पंतप्रधान मोदी यांनी आज, (बुधवारी ) देशवासियांना दिली आहे. देशाला उद्देशून केलेल्या भाषणामध्ये पंतप्रधानांनी डीआरडीओने अंतराळात केलेल्या कारवाईची माहिती दिली. या कारवाईमुळे भारत आता चीन, अमेरिका व रशियानंतरचा चौथा देश ठरला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बुधवारी देशवासियांना संबोधित करताना भारताकडून क्षेपणास्त्राद्वारे एक उपग्रह पाडण्यात यश आल्याचे सांगितले. अशा स्वरुपाची कामगिरी करणारा भारत हा चौथा देश ठरल्याची माहिती त्यांनी दिली. भारताने अंतराळात एका उपग्रहाचा वेध घेतला. या मोहिमेला ‘मिशन शक्ती हे नाव दिले. या चाचणीमुळे देश अंतराळामध्ये महाशक्ती बनला आहे. ‘ही कामगिरी करणारा भारत हा अमेरिका, चीन व रशिया नंतरचा चौथा देश ठरला आहे’ असे मोदी म्हणाले.

भारताने A SAT क्षेपणास्त्राच्या मदतीने LEO मध्ये लाइव्ह सॅटेलाइटचा अवघ्या तीन मिनिटात वेध घेतला. या चाचणीमुळे कोणत्याही आंतरराष्ट्रीय कायदा, तह किंवा कराराचे उल्लंघन झाले नाही, तर हे एक संरक्षणात्मक पाऊल असल्याचे मोदी यांनी नमूद केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.