New Delhi: भारतात एका दिवसांत कोरोनाचे नवे 601 रुग्ण, कोरोनाबाधितांची एकूण संख्या 2014 तर 56 मृत्यू!

एमपीसी न्यूज – भारतात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 2,014 झाली आहे. देशभरात काल एका दिवसांत 601 नवीन कोरोनाबाधित रुग्ण सापडले. मृतांचा आकडा 56 पर्यंत वाढला आहे. तर कोरोनामुक्त झाल्याने 169 जणांना आतापर्यंत घरी सोडण्यात आले आहे. सध्या देशात सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 1,789 आहे.

महाराष्ट्रात एकूण 335 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली त्यापैकी 283 रुग्ण कोरोना सक्रिय आहेत. महाराष्ट्राखालोखाल केरळमध्ये कोरोनाबाधितांची संख्या मोठी आहे. केरळमध्ये सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 239 आहे. तमिळनाडूमध्ये आज एका दिवसांत कोरोनाचे नवीन 110 रुग्ण आढळले. त्यामुळे तमिळनाडू देशात तिसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. त्या राज्यात 227 सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण आहेत. आंध्रप्रदेशात आज एका दिवसात 43 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. या राज्यातील सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 85 झाली आहे.

दिल्लीतील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 123 होती. त्यापैकी सहा रुग्ण बरे झाले असून आता 115 सक्रिय कोरोनाबाधित आहेत. उत्तर प्रदेशात 98, राजस्थानमध्ये 105, कर्नाटकमध्ये 93, तेलंगणामध्ये 77, मध्यप्रदेशमध्ये 80, गुजरातमध्ये 71, जम्मू काश्मीरमध्ये 59, पंजाबमध्ये 41 सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण आहेत.

देशभरात एकूण 47 हजार 951 कोरोना चाचण्या

देशभरात आतापर्यंत एकूण 47 हजार 951 कोरोना चाचण्या घेण्यात आल्याची माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (आय़सीएमआर) प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर यांनी दिली. देशात आयसीएमआरशी संलग्न 126 प्रयोगशाळांमध्ये तसेच खासगी 51 प्रयोगशाळांमध्ये कोरोना चाचणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आतापर्यंत आयसीएमआरच्या प्रयोगशाळांच्या एकूण क्षमतेच्या जमतेम 38 टक्के क्षमतेचाच वापर होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

लष्कराचे साडेआठ हजार डॉक्टरही मदतीसाठी सज्ज

देशावर ओढावलेल्या कोरोनाच्या संकंटामध्ये लष्कराचे साडेआठ हजार डॉक्टर देखील देशबांधवांना वैद्यकीय सेवा देण्यासाठी सज्ज आहेत, अशी माहिती लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.