New Delhi : लायकीत रहा! हरभजन सिंग, युवराज सिंग आणि गौतम गंभीर यांनी घेतला शाहीद आफ्रिदीचा समाचार 

New Delhi: Don't cross the Limit! Shahid Afridi counter-attacked by Harbhajan Singh, Yuvraj Singh and Gautam Gambhir

0

एमपीसी न्यूज –  पाकिस्तानी क्रिकेटपटू  शाहिद आफ्रिदीनं काश्मीर आणि पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं. त्यानंतर आफ्रिदीवर सोशल मीडियावर चौफेर टीका झाली. आफ्रिदीच्या या विधानाचा  भारताचा माजी खेळाडू युवराज सिंग, गौतम गंभीर आणि फिरकीपटू हरभजन सिंग यांनी  चांगला समाचार घेतला.  भज्जीनं तर त्याला मर्यादा ओलांडू नको, लायकीत रहा! असा सज्जड दम भरला.

# शाहिद आफ्रिदी काय म्हणाला होता ?

शाहिद आफ्रिदीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे यात तो कोरोना व्हायरसबाबत बोलत आहे, पण त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काश्मीरबाबत बोलत आहे. या व्हिडीओत आफ्रिदी म्हणतो, कोरोनापेक्षा मोठा रोग मोदी यांच्या मनात आणि डोक्यात आहे. तो आजार धर्माचा आहे. त्या आजारावर ते सत्ता चालवत आहेत. आमच्या काश्मिरी लोकांवर अत्याचार करत आहे. याचे उत्तर त्यांना द्यावचं लागेल. मोदींनी काश्मीरमध्ये भारताचे सात लाख सैनिक तैनात केले आहेत. इतके सैनिक आमच्या संपूर्ण पाकिस्तानच्या सैन्यात आहेत. असं तो व्हिडीओत म्हणत आहे.

बांग्लादेश लक्षात आहे ना? गंभीरची कोपरखळी

गौतम गंभीर आफ्रीदीचा समाचार घेताना म्हणाला, पाकिस्तानजवळ 7 लाख सैन्य असून 20 कोटी लोकं या सैन्याच्या पाठीशी आहेत, असं 16 वर्षीय शाहिद आफ्रिदीने म्हटलंय. तरीही 70 वर्षांपासून काश्मीरसाठी भीक मागत आहेत, असे कडक उत्तर गंभीरने दिले आहे. आफ्रिदी, बाजवा आणि इम्रान खानसारखे लोकं पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल विष पसरवण्याचा काम करतात. ज्यातून पाकिस्तानी लोकांना मूर्ख बनवत आहेत, पण निर्णय येईपर्यंतही काश्मीर तुम्हाला मिळणार नाही. बांग्लादेश लक्षात आहे ना?, असे म्हणत गौतमने आफ्रिदीचा गंभीरने समाचार घेतला.

# युवराज म्हणाला ‘असं विधान मी खपवून घेणार नाही’

आफ्रिदीच्या वादानंतर युवी म्हणाला,”पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल शाहिद आफ्रिदीनं केलेल्या विधानाबद्दल मी खूप निराश आहे. एक भारतीय म्हणून असं विधान मी खपवून घेणार नाही. त्याच्या फाऊंडेशनला मदत करण्याचं आवाहन मी माणुसकीच्या नात्यातून केलं होतं. पण, पुन्हा तसं करणार नाही.

# भज्जीचं सडेतोड उत्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील टीका खपवून घेतली जाणार नाही. तो समाजकार्य करत होता आणि माणूसकी म्हणून मी व युवीनं त्याला मदत करण्याचं आवाहन केलं होतं. पण, आफ्रिदी आमच्या देशाला आणि पंतप्रधानांना नाव ठेवत असेल, तर ते खपवून घेतलं जाणार नाही.
यापुढे आफ्रिदीसोबत मैत्री ठेवणार नाही. त्यानं त्याची मर्यादा ओलांडू नये, अन्यथा त्याची लायकी दाखवून देऊ असा सज्जड दम भज्जीने भरला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like