New Delhi : 3 मेनंतरच्या डोमेस्टिक फ्लाईटसाठी एअर इंडियाचे बुकिंग सुरु

एमपीसीन्यूज : देशभरात लागू असलेले लॉकडाऊन 3  मेपर्यंत सुरु राहणार आहे. मात्र, एअर इंडियाने 3  मेनंतरच्या डोमेस्टिक फ्लाईटसाठी बुकिंगला सुरुवात केली आहे. काही ठराविक डोमेस्टिक फ्लाईटसाठी हे बुकिंग सुरु करण्यात आल्याची माहिती एअर इंडियाच्या संकेतस्थाळावर देण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी कठोर उपाययोजना लागू केल्या. यामध्ये आधी देशभरात 21  दिवसांचा लॉकडाऊन लागू केला. त्यानंतर कोरोनाचा आढावा घेऊन या लॉकडाऊनमध्ये 3  मेपर्यंत वाढ केली. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रकारची प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली आहे.

दरम्यान, एअर इंडियाने 3  मेनंतरच्या डोमेस्टिक फ्लाईटसाठी बुकिंगला सुरुवात केली आहे. काही ठराविक डोमेस्टिक फ्लाईटसाठी हे बुकिंग सुरु करण्यात आल्याची माहिती एअर इंडियाच्या संकेतस्थाळावर देण्यात आली आहे.

तसेच आंतराष्ट्रीय विमानसेवेसाठी 1  जुननंतरचे बुकिंग सुरु करण्यात आले आहे. वेळोवेळी निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा आढावा घेऊन याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे एअर इंडियाच्या संकेतस्थाळावरील संदेशात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.