New Delhi : केंद्राकडून मुंबईसह 130 शहरे रेड झोन जाहीर

महाराष्ट्रात 14 रेड झोन,16 ऑरेंज झोन आणि सहा ग्रीन झोन

एमपीसी न्यूज  मुंबई – केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने 130 शहरांंना रेड झोन म्हणून जाहीर केले आहे. त्यापैकी 14 शहरे महाराष्ट्रातील आहेत. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्रं पाठवली आहेत. त्यात 3 मे रोजी संपणाऱ्या लॉकडाऊनच्या कालावधीनंतर करावयाच्या अंमलबजावणीसाठी झोन तयार केले आहेत. त्यात दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकता, अहमदाबाद  , हैदराबाद, बेंगळूरु यासह 130 शहरांना रेड झोन म्हणून जाहीर केले आहे. महाराष्ट्रात 14 रेड झोन, 16 ऑरेंज झोन आणि सहा ग्रीन झोन आहेत.

झोनच्या सीमा निश्चित करायचे काम राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थावर सोपविण्यात आले आहे. पुण्याचा विचार करावयाचा झाल्यास या अहवालानुसार सध्या कडक कर्फ्यू असलेल्या भागात लॉकडाऊनचे निर्बंध कदाचित पुढचे पंधरा दिवस चालू राहातील. ऑरेंज झोन आणि ग्रीन झोनमधील निर्बंध कदाचित शिथील होतील. त्यापैकी ग्रीन झोनमध्ये सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच यावेळात व्यवहार चालू ठेवण्याला परवानगी मिळण्याची शक्यता आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.