New Delhi : देशाचं नाव इंडिया हटवून भारत करा; सुप्रीम कोर्टात याचिका, उद्या होणार सुनावणी

Change the name of the country to India; The petition will be heard in the Supreme Court tomorrow

एमपीसी न्यूज – दिल्लीतल्या एका नागरिकाने देशाचं नाव इंडिया ऐवजी भारत करावं अशी मागणी जनहित याचिकेतून केली आहे.

या याचिकेवर 3 जून रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. इंडिया हे ब्रिटीशांनी दिलेलं नाव आहे. या नावातून गुलामगिरीचा प्रत्यय येतो. त्यामुळे हे नाव बदलण्यात यावं अशी मागणी याचिकाकर्त्यानं केली आहे.

नावात काय आहे असं शेक्सपियरनं म्हटलं असलं तरी भारतीय राजकारणात मात्र अनेकदा अस्मितेच्या राजकारणासाठी या नामकरणाचा वापर झालेला आहे. खरंतर आत्ता देशात इंडिया आणि भारत ही दोनही नाव प्रचलित आहेत.

गरीब श्रीमंतीचा भेद दाखवण्यासाठी या दोन नावांचा वापर रुपकासारखा केला जातो. इंडिया हे ब्रिटीश राजवटीतलं नाव तर हिंदुस्थान हे मुघल काळातलं प्रचलित नाव. तर पुराणांमध्ये मात्र भारतभूमी किंवा भारतवर्ष असा उल्लेख असल्याचं याचिकेत म्हटलं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.