New Delhi : दिलासादायक!; एका दिवसात 705 रूग्ण कोरोनामुक्त, रुग्ण बरे होण्याची टक्केवारी 17.48

एमपीसी न्यूज – एका दिवसात 705 रूग्ण कोरोनामुक्त झाल्याची दिलासादायक माहिती समोर आली आहे. सोमवार (दि.20) 705 जण कोरोनामुक्त झाले असून आजपर्यंतचा एका दिवसात रुग्ण बरे होण्याचा उच्चांक गाठला आहे. आतापर्यंत 3252 लोक कोरोनामुक्त झाले असून रुग्ण बरे होण्याची टक्केवारी 17.48 इतकी झाली आहे. देशात आतापर्यंत 18601 कोरोना पॉझिटिव्ह प्रकरणांची नोंद झाली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी नुकतीच दिली.

गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनामुळे 47 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर, 1 हजार 336 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. यामुळे देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 18 हजार 601 वर पोहचली आहे. तर 590 जणांचा मृत्यू झाला आहे. 14 हजार 759 जणांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून 3252 लोकांना उपचारानंतर घरी पाठण्यात आल्याची माहिती लव अग्रवाल यांनी दिली.

_MPC_DIR_MPU_II

यावेळी लव अग्रवाल म्हणाले, 23 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील एकुण 64 जिल्ह्यात मागील 14 दिवसांत एकही कोरोना रुग्णांची नोंद झाली नाही. यामध्ये महाराष्ट्रातील लातूर, उस्मानाबाद, हिंगोली आणि वाशिम या चार जिल्ह्यांचा समावेश झाला आहे. रुग्ण बरे होण्याच्या संख्येत केरळ राज्य आघाडीवर आहे. देशात कोरोनाची रुग्ण संख्या दुप्पट होण्यासाठी लागणारे दिवस वाढले आहेत, पूर्वी 3 दिवसात दुप्पट होणारी संख्या आत्ता सरासरी 7.5 दिवसांमध्ये ही संख्या दुप्पट होत आहे.

राज्यांनी रॅपीड टेस्टिंग किटचा तुर्तास वापर करू नये तसेच किटची योग्यता तपासून तसेच चाचणी आणि प्रमाणीकरण करून त्याच्या वापराबद्दल येत्या दोन दिवसांत योग्य निर्देश दिले जातील असे आयसीएमआरचे डाॅ. गंगाखेडकर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.