New Delhi : कोरोनाचे 1490 नवीन रुग्ण, 56 बळी, एकूण रुग्ण 24,942

एमपीसी न्यूज – देशात गेल्या 24 तासांत 1490 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर 56 जणांचा मृत्यू झाला. 1490 नवीन रूग्णांमुळे देशातील एकूण रुग्ण संख्या 24942 झाली आहे. आतापर्यंत 5210 जण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनामुळे 779 जणांचा बळी गेला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली.

आतापर्यंत 5210 जण कोरोनामुक्त झाल्यामुळे देशात 18953 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. देशात चाचण्यांचे प्रमाण वाढल्यानंतर कोरोनाचे रुग्ण आवाक्याबाहेर वाढलेले नाहीत, ही चांगली गोष्ट आहे, असं आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले. देशात सध्या कोरोनामुळे झालेल्या मृत्यूचं प्रमाण 3.1% असून हा मृत्यूदर इतर काही देशांच्या तुलनेत कमी आहे. कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढत आहे व सध्या हे प्रमाण 20 टक्क्यांहून अधिक आहे.

आरोग्यमंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशात कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा वेग 9.1 दिवस आहे आणि तो हळूहळू वाढतो आहे. कोरोनाची साथ आटोक्यात येत असल्याचं हे चिन्ह मानलं जातं आहे. देशात शुक्रवारनंतरच्या 24 तासात कोरोना रुग्णवाढीचं प्रमाण 6 टक्के राहिलं आहे. ही वाढ गेल्या कित्येक दिवसातील कमी वाढ आहे. पहिल्या 100 रुग्णांनंतर हा रुग्णवाढीचा वेग वाढत होता. तो आता पहिल्यांदाच कमी होत असल्याचे सांगितले जात आहे.

भारतात कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर बऱ्याच दिवसांनी रुग्णवाढीचा दर मंदावल्याचं चित्र आहे. हि बाब चांगली असल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.