New Delhi: आशादायक बातमी! कोरोना रुग्ण दुपटीकरणाच्या कालावधीत 11 दिवसांपर्यंत वाढ

चोवीस तासांत 1,718 नवे रुग्ण, कोरोना रुग्णांची संख्या 33 हजारांवर, मृतांचा आकडा 1075 वर

एमपीसी न्यूज – देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच एक आशादायक माहिती उपलब्ध झाली आहे. देशातील कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 11 दिवसांपर्यंत वाढला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी देशातील कोरोना रुग्णांचा दुपटीकरणाचा दर 3.41 दिवस होता. देशातील काही राज्यांमध्ये काही रांज्यांमध्ये कोरोना रुग्ण दुप्पट होण्यासाठी 40 दिवसांचा कालावधी लागत आहे, हे विशेष म्हणावे लागेल. लॉकडाऊन यशस्वीरित्या पाळल्याने कोरोनाला अनेक ठिकाणी रोखण्यात यश आल्याचा दावा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केला आहे.

देशात मागील 24 तासांमध्ये 1 हजार 718 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. परिणामी देशात एकूण कोरोना रुग्णांची संख्या 33 हजार 050 झाली आहे. पैकी 23 हजार 651 रुग्ण सध्या देशभरातील विविध रुग्णांलयांमध्ये उपचार घेत आहे.  मागील 24 तासांत 630 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे आतापर्यंत एकूण 8 हजार 324 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सकारात्मक बाब म्हणजे कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर देखील वाढला आहे. 14 दिवसांपूर्वी कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 13.06 टक्के होता. तो आता 25 टक्क्यांच्यावर पोहचला आहे. देशातील कोरोनाबाधितांचा मृत्यूदरही जगाच्या तुलनेत निम्म्याहून कमी आहे. आतापर्यंत देशात कोरोनाबाधित 1075 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना संसर्ग दुपटीकरणाचा वेग सरासरीपेक्षा कमी असलेली राज्ये

दिल्ली, उत्तर प्रदेश, ओडिशा, तमिळनाडू, राजस्थान, जम्मू काश्मीर, पंजाब (11 दिवसांपेक्षा अधिक)

दुपटीकरणाचा वेग 20 ते 40 दिवसांच्या दरम्यान असलेली राज्ये

कर्नाटक, हरियाणा, लडाख, केरळ, उत्तराखंड

दुपटीकरणासाठी 40 दिवसांहून अधिक काळ लागणारी राज्ये

आसाम, तेलंगणा, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश

डबलिंग रेट देशात वाढवण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. कोविड19 व्यतिरिक्त इतर आजारांवर उपचार घेणाऱ्यांकडे दुर्लक्ष होता कामा नये, अशा सूचना राज्यांना दिल्या आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.