Pranav Mukherjee Passed Away : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन

गेल्या 10 दिवसांपासून त्यांची प्रकृती नाजूक होती व ते व्हेंटिलेटरवर होते.

एमपीसी न्यूज – भारताचे माजी राष्ट्रपती आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते प्रणव मुखर्जी (84) यांनी दिल्लीतील रिसर्च अँड रेफरल रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गेल्या 10 दिवसांपासून त्यांची प्रकृती नाजूक होती व ते व्हेंटिलेटरवर होते. त्यांचा मुलगा अभिजित मुखर्जी यांनी त्यांच्या निधनाबद्दल माहिती दिली आहे.

प्रणव मुखर्जी यांच्या मेंदूत रक्ताच्या गाठी झाल्यामुळे त्याच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मंगळवारी त्यांची प्रकृती ढासळली होती.

त्यानंतर त्यांच्या तब्येतीत कोणतीही सुधारणा दिसली नाही. प्रणव मुखर्जी यांना करोनाची लागण झाल्याचेही स्पष्ट झाले होते. त्यांच्या तब्येतीत सुधारणा व्हावी यासाठी डॉक्टरांनी अथक प्रयत्न केले. मात्र, त्यांना यश येऊ शकले नाही. आज त्यांची प्राणज्योत मालवली.

देशाचे विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि गृहमंत्री अमित शहा यांनी प्रणव मुखर्जी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.