New Delhi: छाती दुखू लागल्याने माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग रुग्णालयात दाखल

New Delhi: Former Prime Minister Dr. Manmohan Singh hospitalized due to chest pain

एमपीसी न्यूज – भारताचे माजी पंतप्रधान व काँग्रेसचे नेते डॉ. मनमोहन सिंग यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं आहे. रविवारी रात्री आठच्या सुमारास त्यांच्या छातीत दुखायला लागले व त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर डॉ. मनमोहन सिंग यांना रुग्णालयात हालविण्यात आले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असून प्रकृतीबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

एम्समध्ये त्यांना हृदरोग उपचार विभागात दाखल कऱण्यात आले आहे. डॉ. मनमोहन सिंग यांना हृदय विकाराचा त्रास आहे. नामवंत अर्थतज्ज्ञ असलेले 87 वर्षीय मनमोहन सिंग यांनी युपीए सरकारच्या काळात सलग दहा वर्षे पंतप्रधान पद भूषविले होते.

डॉ. मनमोहन सिंग यांनी 2004 ते 2014 या काळात देशाच्या पंतप्रधानपदाची धुरा सांभाळली. त्याआधी त्यांनी 1991 मध्ये नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्री म्हणून काम पाहिले होते. कोरोनामुळे सध्या उद्भवलेल्या स्थितीसाठी काँग्रेसने एक समिती तयार केली आहे. त्या समितीच्या  अध्यक्षपदाची जबाबदारी देखील डॉ. मनमोहन सिंग यांच्याकडे आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.