New Delhi : कोरोनाच्या माहितीसाठी भारत सरकारने सुरु केला ‘व्हाट्सअँप हेल्पडेस्क’

एमपीसी न्यूज – भारत सरकारच्या आरोग्य विभागाकडून व्हाट्सअँप हेल्पडेस्क सुरु करण्यात आला आहे. +91 9013151515 या नंबर वरून ‘चाटबोट’ च्या माध्यमातून कोरोनाविषयी हवी ती विश्वासार्ह माहिती मिळवता येणार आहे.

या शिवाय +91-11-23978046 आणि 1075 (टोल फ्री) नंबरवरून तसेच [email protected] या ई-मेल द्वारे भारतीय नागरिकांचे कोरोनाविषयीच्या शंकांचे निरसन केले जाणार आहे.

यासाठी व्हाट्सअँप हेल्पडेस्कचा +91 9013151515 हा नंबर मोबाईलमध्ये सेव्ह करायचा आहे. त्यांनतर मोबाईलमधील व्हाट्सअँप अँप्लिकेशनमध्ये जाऊन या नंबरला फक्त ‘HI’ मेसेज करायचा आहे. हा मेसेज केल्यानंतर लगेच तुम्हाला रिप्लाय मिळतो, ज्यामध्ये A ते F पर्यंत वेगवेगळे पर्याय दिलेले असतात. समजा तुम्ही A टाईप करून पाठवले तर त्यासंबंधित माहिती तुम्हाला मिळते.

उदाहरणादाखल, A या पर्यायावर कोरोना म्हणजे काय आणि त्याची लक्षणे कोणती, असा प्रश्न आहे . तुम्ही A टाईप केले तर या प्रश्नाचे उत्तर व त्याच्याशी निगडित वीडिओची यु-टूब लिंक तुम्हाला व्हाट्सअँपवर मिळते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.