New Delhi : हार्दिक पांड्या लग्नाआधीच ‘बाप’ होणार, सोशल मीडियावरून दिली माहिती

Hardik Pandya will be 'Baap' before marriage, information given on social media

एमपीसी न्यूज – इंडियाचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या लग्नाआधीच बाप होणार आहे. हार्दिक पांड्याने त्याची होणारी बायको नताशा स्टानकोविचसोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर टाकला आहे. नताशाच्या पोटावर हात ठेवलेला फोटो टाकून हार्दिक पांड्याने तो बाप होणार असल्याची माहिती दिली आहे.

हार्दिकने इन्स्टाग्रामवर टाकलेल्या पोस्टमध्ये   लिहिले आहे की, नताशा आणि माझा एकमेकांसोबतचा प्रवास खूपच चांगला होता.  आता हा प्रवास आणखी चांगला होणार आहे. आमच्या आयुष्यात येणाऱ्या नव्या पाहुण्याचं स्वागत करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.

आयुष्याच्या या नव्या वळणासाठी आम्ही उत्साही आहोत. तुमच्या सगळ्यांच्या आशिर्वादाची गरज आहे, अशी पोस्ट हार्दिकने टाकली आहे.

या बहूचर्चित  जोडप्याने नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी दुबईमध्ये साखरपुडा केला होता. याबाबत हार्दिक पांड्याने इन्स्टाग्रामवरुन माहिती दिली होती. या दोघांनी अद्याप लग्न केले नाही.

हार्दिक नताशाचा बोटमधील साखरपुड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.