New Delhi : ‘संसर्गित रुग्णाच्या संपर्कातील लोकांचा शोध घेताना वृद्ध आणि इतर आजार असलेल्या व्यक्तींना प्राधान्य द्या’

New Delhi: 'Give priority to the elderly and people with other ailments when searching for people in contact with a corona-infected patient' कोरोनाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ होत असलेल्या निवडक जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांशी आरोग्य सचिवांची चर्चा

एमपीसी न्यूज – संसर्गित रूग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेताना संसर्गाचा अति धोका असलेल्या व्यक्तीना, दुर्बल घटक म्हणजेच ज्येष्ठ नागरिक आणि इतर आजार असलेल्या व्यक्तींना प्राधान्य द्या. तसेच निरीक्षण उपाययोजना अधिक प्रभावी करा, पुरेशा चाचण्या करा आणि लक्षणे गंभीर होण्यापूर्वीच, रुग्णांना योग्य ते उपचार द्या, अशा सूचना केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सुदान यांनी दिल्या.

केंद्रीय आरोग्य सचिव, प्रीती सुदान आणि आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाचे विशेष अधिकारी, राजेश भूषण यांच्यासह आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज (सोमवारी, दि. 8) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून, कोविडविषयक उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली.

देशातील महाराष्ट्र, तेलंगणा, तामिळनाडू, राजस्थान, हरियाणा, गुजरात, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, उत्तराखंड आणि मध्यप्रदेश या 10 राज्यांमधील, 38 जिल्हे आणि 45 महापालिका क्षेत्रात कोविड-19 च्या रुग्णांचे लक्षणीय प्रमाण असून, या जिल्ह्यातील, जिल्ह्याधिकारी, महापालिका आयुक्त, मुख्य आरोग्य अधिकारी, जिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक आणि वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता, या बैठकीत सहभागी झाले होते. या बैठकीत केंद्रीय आरोग्य सचिव, प्रीती सुदान यांनी सूचना दिल्या.

बैठकीत प्रामुख्याने शहरी भागातील घनदाट वस्तीत-जिथे सार्वजनिक सोयी-सुविधा वापरल्या जातात तिथे वाढणारा संसर्ग नियंत्रणात आणण्यावर चर्चा झाली. या भागात घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणे, त्वरित चाचण्या आणि अलगीकरण, तसेच रुग्णांचे वैद्यकीय व्यवस्थापन आणि प्रतिबंधक धोरण या सर्व उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात आला. रुग्णांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी काय काळजी घेतली जावी, याची माहितीही अधिकाऱ्यांना देण्यात आली.

राज्याच्या अधिकाऱ्यांना प्रतिबंधक क्षेत्रातील उपाययोजनांविषयी मार्गदर्शन करण्यात आले, तसेच बफर झोनमध्ये निरीक्षण आणि कोविडचा संसर्ग टाळण्यासाठी पाळायचे नियम आणि सवयींची माहिती जनतेला वारंवार देण्याच्या सूचना देण्यात आल्या.

कोविड-19 च्या प्रतिबंधनासाठी पायाभूत आरोग्य सुविधा आणि मनुष्यबळ उपलब्धतेविषयी झालेल्या चर्चेत, अशी सूचना करण्यात आली की आरोग्य पायाभूत सुविधांसाठी पुरेसे नियोजन केले जावे, पुरेशी निरीक्षण पथके उपलब्ध केली जावीत आणि खाटांच्या व्यवस्थापनासाठी, एक यंत्रणा कार्यान्वित केली जावी. वैद्यकीय क्षेत्रातील व्यावसायिक मदत घेण्यासाठी एक उत्कृष्टता केंद्र सुरु केले जावे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची तिथे नेमणूक करून त्यांच्या माध्यमातून नागरिकांना आवश्यक त्या आरोग्य सुविधांविषयी माहिती द्यावी.

प्रत्यक्ष प्रशासकीय जबाबदाऱ्यांविषयी बोलतांना, महापालिका आयुक्त आणि अधिकाऱ्यांना पुढाकार घेऊन महापालिकांच्या सर्व पायाभूत सुविधांचा वापर प्रतिबंधन उपाययोजनांसाठी केला जावा, यासाठी, ‘सर्वसमावेशक दृष्टीकोन’ ठेवावा, असा सूचना देण्यात आल्या.कोविड-19 च्या प्रतिबंधनासोबतच, नियमित आणि अत्यावश्यक आरोग्य सुविधा देखील उपलब्ध असाव्यात, यावर यावेळी भर देण्यात आला.

ज्यांच्याकडे सातत्याने लक्ष देणे गरजेचे आहे अशा भागात घरोघरी जाऊन सर्वेक्षण करुन रुग्ण शोधणे, सर्वेक्षण पथकांची व्यवस्था, रुग्णवाहिकेचा प्रभावी उपयोग, रुग्णालयात, रुग्णांवरील उपचारांचा प्राधान्यक्रम ठरवणे आणि खाटांचे व्यवस्थापन, रुगणालयात असलेल्या रूग्णांवर देखरेख ठेवण्यासाठी, चोवीस तास, पाळ्यांमध्ये वैद्यकीय चमूंची उपलब्धता असणे आणि रुग्ण दगावण्याचे प्रमाण कमी ठेवणे, यासाठी चाचण्यांचे रिपोर्ट्स लवकर मिळण्याची व्यवस्था व वेळेत उपचारांची सोय करावी.

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी ग्रामीण भागात जनजागृती आणि जनतेमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींची मदत घ्यावी, असा सल्लाही या बैठकीत देण्यात आला. बफर झोनमध्ये SARI किंवा ILI चे रुग्ण शोधण्यासाठी ताप तपासणारे दवाखाने सुरु ठेवावेत. लॉकडाऊन मध्ये शिथिलता देण्यात आल्यामुळे, कोविड प्रबंधणासाठी राज्यांनी,येत्या काही महिन्यासाठीच्या तयारीची जिल्हानिहाय योजना तयार करावी, असा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे.

आतापर्यंत देशभरात, कोविडचे 1 लाख 24 हजार 430 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. गेल्या 24 तासात, 5 हजार 137 रुग्ण बरे झाले. यामुळे सध्या देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 48.49% इतका आहे. सध्या उपचाराखाली असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 24 हजार 981 इतकी आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.