New Delhi : अशी झाली निर्भया प्रकरणातील दोषींच्या फाशीची अंमलबजावणी….

एमपीसी न्यूज – देशभर गाजलेल्या निर्भया सामूहिक बलात्कार व खून प्रकरणातील मुकेश सिंग, पवन गुप्ता, विनय शर्मा, अक्षय कुमार सिंग या चारही दोषींना आज (शुक्रवारी) पहाटे साडेपाच वाजता फाशी देण्यात आली. कशी झाली या शिक्षेची अंमलबाजणी ते जाणून घेऊयात…..

निर्भया प्रकरणातील गुन्हेगार कसे लटकले फासावर?

  • मरणाच्या भीतीने आरोपींना रात्रभर झोप लागली नाही.
  • चारही आरोपींना पहाटे सव्वातीन वाजता उठविण्यात आले.
  • चारही आरोपींनी आंघोळ केली नाही.
  • तिहार तुरुंगाचे डीजी संदीप गोयल चार वाजता तुरुंगात आले.
  • दोषींच्या अंतिम इच्छा विचारण्यात आली.
  • त्यावेळी दोघांनी ते दोषी नसल्याचे सांगितले.
  • दोषींच्या अंतिम इच्छेनुसार त्यांना देवाची पूजा करू देण्यात आली. त्यासाठी तुरुंगात पुरोहिताला पाचारण करण्यात आले.
  • चारही दोषींना चहा- नाश्ता करण्यास सांगितले, मात्र त्यांनी नकार दिला.
  • पहाटे सव्वाचार वाजता जल्लाद तिहार तुरुंगात जेल नं. 3 मध्ये दाखल.
  • दोषींसाठी एकूण आठ फास तयार करण्यात आले होते.
  • पश्चिम दिल्लीचे जिल्हा दंडाधिकारी तुरुंगात दाखल झाले.
  • चौघांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
  • चारही दोषींना काळे कपडे घालण्यात आले.
  • पाठीमागे हात बांधून तोंडावर काळा बुरखा घालण्यात आला.
  • सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून साडेपाच वाजता चौघांना फासावर लटकविण्यात आले.
  • फाशीच्या वेळी तुरुंग महासंचालक, तुरुंग अधीक्षक, तीन उपअधीक्षक, जिल्हाधिकारी, डॉक्टर व भटजीही उपस्थित.
  • फासाला लटकलेले मृतदेह 6 वाजून 20 मिनिटांनी खाली उतरविले.
  • डॉक्टरांनी तपासणी करून चौघांना मृत घोषित केले.
  • इतिहासात पहिल्यांदाच चारही दोषींना एकत्र फाशी देण्यात आली.

संबंधित आणखी बातम्या

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.