New Delhi: कोरोनाबाधितांच्या जागतिक क्रमवारीत भारत 26 वरून 24 व्या स्थानावर, रुग्णांची संख्या पाच हजारपेक्षा जास्त

चिली व चेक रिपब्लिकला भारताने मागे टाकले, फ्रान्सने जर्मनीचे स्थान

एमपीसी न्यूज – भारताने पाच हजार कोरोनाबाधितांचा टप्पा ओलांडला असून चिली आणि चेक रिपब्लिक पेक्षाही जास्त रुग्णसंख्या झाल्याने कोरोनाबाधित देशांच्या जागतिक क्रमवारीत भारताने 26 व्या क्रमांकावरून 24 क्रमांक गाठल्याने चिंतेत अधिकच भर पडली आहे. भारतात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने ती रोखण्याचे मोठे आव्हान भारतापुढे आहे. पाचव्या क्रमांकावर असलेल्या फ्रान्सने चौथ्या क्रमांकावरील जर्मनीचे स्थान मिळविले.

कोविड-19 या विषाणूचा उगम चीनमधील वुहान शहरातून झाला. जागतिक क्रमवारीत सर्वात पुढे असणाऱ्या चीनने गेल्या महिनाभरात कोरोना प्रसार रोखण्यात मोठे यश मिळविले असून आता हा देश सहाव्या क्रमांकापर्यंत खाली आला आहे. इतर देशांमधील कोरोनाबाधितांची वाढणारी संख्या आणि चीनने मिळविलेले नियंत्रण लक्षात घेता, चीनचा लवकरच आपली क्रमवारी आणखी खाली आणण्यात यशस्वी होईल, अशी खात्री चीनच्या राज्यकर्त्यांना वाटत आहे.

कोरोनाबाधित देशांच्या क्रमवारीत चीननंतर इटलीचा क्रमांक लागत होता. मात्र अमेरिका व स्पेनने आता इटलीलाही मागे टाकले आहे. कोरोनाबाधित देशांची क्रमवारी, त्या देशातील कोरोनाबाधितांची व मृतांची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे.

  1. अमेरिका – 4,00,335 (12,841)
  2. स्पेन – 1,41,942 (14,045)
  3. इटली – 1,35,586 (17,127)
  4. फ्रान्स – 1,09,069 (10,328)
  5. जर्मनी – 107,663 (2016)
  6. चीन – 81,740 (3,331)
  7. इराण – 62,589 (3,872)
  8. यू. के. – 55,242 (6,159)
  9. टर्की – 34,109 (725)
  10. स्वित्झर्लंड  -22,253 (821)
  11. बेल्जियम – 22,194 (2,035)
  12. नेदरलँड – 19,580 (2,101) 
  13. कॅनडा – 17,897 (381) 
  14. ऑस्ट्रीया – 12,639 (243)
  15. ब्राझील – 14,034 (686)
  16. पोर्तुगाल – 12,440 (345) 
  17. दक्षिण कोरिया – 10,331 (192)
  18. इस्राईल – 9,248 (65) 
  19. स्वीडन – 7,693 (591) 
  20. रशिया – 7,497 (58)
  21. ऑस्ट्रेलिया – 5,988 (49)
  22. नॉर्वे – 6,086 (89)
  23. आयर्लंड – 5,709 (210)
  24. भारत – 5,351 (160)   

आकडेवारीत अन्य देशांच्या तुलनेत भारतातील कोरोनाबाधितांची संख्या व मृतांची आकडेवारी कमी दिसत असली तरी प्रगत राष्ट्रांनी कोरोना चाचण्यांची क्षमता वाढविल्यामुळे त्यांच्याकडील आकडे मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्या मानाने भारताची कोरोना चाचण्यांची क्षमता खूपच कमी आहे. भारतातील कोरोना चाचण्यांची संख्या वाढेल तसतशी ही आकडेवारीही वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.