New Delhi : जैन मुनी तरुण सागरजी यांचे निधन

एमपीसी न्यूज- आपल्या अमोघ वाणीने अहिंसेचे तत्वज्ञान जनमानसामध्ये रुजवणारे जैन मुनी तरुण सागरजी (वय 51 )आज पहाटे यांचे दिल्ली येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांना कावीळ झाली होती. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी 3 वाजता दिल्ली मेरठ रस्त्यावर असलेल्या तरुणसागरम तीर्थ या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. निधनाची बातमी कळताच त्यांच्या अंतिम दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने दिल्लीकडे धाव घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.