New Delhi : ‘डीआरडीओ’कडून प्रयोगशाळा विकसित; दिवसाला हजार करोना टेस्टची क्षमता

एमपीसी न्यूज : देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी मोबाइल व्हायरॉलॉजी रिसर्च अँड डायग्नोस्टिक प्रयोगशाळेच व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उद्घाटन केले. या लॅबमुळे कोविड -19 शी संबंधित संशोधन आणि चाचण्या वेगाने करणे शक्य होणार आहे. संरक्षण संशोधन विकास संस्था डीआरडीओ, हैदराबादस्थित एक हॉस्पिटल आणि खासगी उद्योगाने मिळून ही ‘एमव्हीआरडीएल’ लॅब विकसित केल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाच्यावतीने देण्यात आली.

_MPC_DIR_MPU_II

करोना व्हायरसविरोधातील लढाईत अनेक सरकारी संस्था सहभागी आहेत. यात ‘डीआरडीओ’सुद्धा आघाडीवर आहे. त्यासाठी व्हेंटिलेटर, पीपीई किटसह करोनावर उपचारासाठी आवश्यक ठरणाऱ्या उपकरणांची निर्मिती डीआरडीओने केली आहे. डीआरडीओने बायोसेफ्टी लेव्हल २ आणि ३ ही प्रयोगशाळा विक्रमी १५ दिवसांमध्ये उभी केल्याबद्दल राजनाथ सिंह यांनी डीआरडीओचे अभिनंदन केले आहे.

दरम्यान, अशी प्रयोगशाळा उभी करण्यासाठी सर्वसाधारणपणे सहा महिने लागतात. करोना व्हायरसच्या चाचणीचे दिवसाला १ हजार नमुने तपासण्याची या लॅबची क्षमता आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि इंडियन काऊंन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या मार्गदर्शक तत्वानुसार ही लॅब उभी करण्यात आली आहे, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाकडून देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.