New Delhi : आयसीएमआरच्या मते, लॉकडाऊन जास्तीत जास्त 20 ते 25% कोरोना संक्रमण कमी करेल?

एमपीसी न्यूज- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात लॉकडाऊन वाढविण्यापूर्वी भारतीय वैद्यकीय संशोधन मंडळाच्या (आयसीएमआर) अंतर्गत अभ्यासात असे दिसून आले आहे की, नोव्हेल कोरोना व्हायरस भारतामध्ये समुदाय संक्रमण (मास ट्रान्समिशन) करेल आणि सरकारला लाॅकडाऊनच्या काळात फक्त अधिक चाचण्या व दवाखाने सुसज्ज करण्यासाठी वेळ मिळेल.

‘आयसीएमआर’च्या या अभ्यासाचे निष्कर्ष अप्रकाशित आहेत, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सरकारला देण्यात आलेल्या सल्लागार सादरीकरणात या निष्कर्षांचा संदर्भ वापरला गेला होता. 23 एप्रिल रोजी प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, अहवालातील कलम 14 मध्ये एक वर्षापर्यंत हा विषाणूचा प्रसार होत राहील, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते.

‘आयसीएमआर’चा अभ्यास पुढे असे सांगतो की, लॉकडाऊन हा पर्याय विषाणूची लागण होणाऱ्या लोकांची संख्या कमी करू शकत नाही, परंतु त्याच्या प्रसाराचा दर काहीसा कमी करेल. यामधील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा की, इतर कोणताही नियंत्रणाचा उपाय सध्या उपलब्ध नसताना, लॉकडाउन उठवल्यामुळे संक्रमणाचा धोका अधिक वाढू शकतो, असेही यामध्ये नमूद करण्यात आले आहे.

निती आयोगाचे सदस्य विनोद के. पॉल यांनी अहवालातील कलम 14 नुसार दिलेल्या सादरीकरणात असे म्हटले आहे की, आयसीएमआरच्या मूल्यांकनानुसार लॉकडाऊन विस्तारामुळे केवळ कोरोनाचे ‘पीक इन्फेक्शन’ कमकुवत  होते आणि ते अंमलात आणणे आव्हानात्मक असेल. आयसीएमआरच्या मतानुसार लॉकडाऊनचे कडक अंमलबजावणी केली तर 40% संक्रमण रोखता येऊ शकते पण अंतिम रुग्णसंख्येवर काहीच परिणाम होणार नाही. आयसीएमआरच्या तज्ज्ञांनी असेही म्हटले आहे की, लॉकडाउन केवळ 20-25% इतक्याच प्रमाणात प्रकरणे खाली आणू शकेल.

पॉल यांनी आपल्या सादरीकरणात सरकारला आणखी वैद्यकीय सुविधा सुरू करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, जेव्हा एखाद्या भागात दररोज 500 संक्रमित रूग्ण आढळतात, तेव्हा सरकारला 150 व्हेंटिलेटर, 300 अतिदक्षता विभागातील खाटा आणि 1200 – 6000  खाटांची आवश्यकता असते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.