New Delhi: महाराष्ट्रात 11 जूनला मॉन्सून दाखल होणार, Skymet चे भाकित

New Delhi: Monsoon to arrive in Maharashtra on June 11, Skymet predicts

एमपीसी न्यूज – वैशाख महिन्याच्या मध्यावर मॉन्सूनचे अंदाज व्यक्त होऊ लागले आहेत. स्कायमेट संस्थेने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार भारतात केरळमध्ये एक जूनला केरळमध्ये आणि नंतर 11 जूनला महाराष्ट्रात मुंबई, कोकण भागात मॉन्सूनचे आगमन होईल.

स्कायमेट संस्थेने पावसाळ्याचे वेळापत्रकच दिले आहे. त्यात आठ ऑक्टोबर ही परतीच्या पावसाची मुदत असेल असे म्हटले आहे. त्या संस्थेच्या अंदाजानुसार संपूर्ण चार महिने पाऊस राहील. यंदा १०० टक्के पाऊस असेल असे भाकीत यापूर्वी विविध संस्थांनी केले आहे.

अवघ्या एक महिन्यावर पावसाळा येऊन ठेपला आहे. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर सरकारला आणि लोकांनाही उपाययोजना कराव्या लागणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.