New Delhi: देशभर लॉकडाऊन 4.0 ची घोषणा, काय सुरू राहणार? कशावर बंदी?

New Delhi: Nationwide Lockdown 4.0 announced, what will continue? Ban on what?

एमपीसी न्यूज – देशभरात लॉकडाऊन 4.0 ची घोषणा करण्यात आली आहे. लॉकडाऊनचा चौथा टप्पा 18 मे ते 31 मे पर्यंत असा 14 दिवसांचा असणार आहे. त्यामुळे देशातील चारही लॉकडाऊनचा मिळून कालावधी 68 दिवसांचा असणार आहे. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यातही देशभरातील सर्व मॉल, शाळा, कॉलेज, जिम, क्रीडांगणे इत्यादी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय देशभरातील मेट्रो आणि विमानसेवाही 31 मेपर्यंत बंद राहणार आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येनुसार झोन व कंटेनमेंट झोन निश्चित करण्याचे अधिकार संबंधित राज्य शासनांना राहतील.

रेड झोन, ऑरेंज झोन, ग्रीन झोन, कंटेनमेंट झोनबाबतचे निर्णय घेण्याचे अधिकार आता संबंधित राज्यांना असणार आहेत. अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तशी मागणी केली होती. मात्र केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नियामावलीचं पालन करणे सर्व राज्यांना बंधनकारक असणार आहे. कंटेनमेंट झोनमध्ये फक्त जीवनाश्यक गोष्टींना परवानगी असेल. रात्री 7 ते सकाळी 7 वाजेपर्यंत देशभर संचारबंदी असणार आहे. फक्त जीवनाश्यक गोष्टींना परवानगी देण्यात आली आहे.

लॉकडाऊन 4.0 मध्ये ‘हे’ सुरू राहणार

  • ऑनलाईन लर्निंग सुरु राहणार.
  • स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि स्टेडियम सुरु होणार, मात्र प्रेक्षकांना जमा होण्यास परवानगी नाही.
  • स्टेडियम प्रॅक्टिससाठी सुरु होणार.
  • सरकारी कार्यालये सुरु होणार.
  • सरकारी कॅन्टीन सुरु राहणार.

लॉकडाऊन 4.0 मध्ये ‘हे’ बंद राहणार

  • विमानसेवा बंद राहणार.
  • मेट्रो सेवा बंद राहणार.
  • शाळा-कॉलेज बंद राहणार.
  • हॉटेल, रेस्टॉरंट बंद राहणार.
  • थिएटर, शॉपिंग मॉल, जिमही बंदच राहणार.
  • धार्मिक, सामाजिक कार्यंक्रमांना परवानगी नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.