New Delhi: भारतात 508 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांची एकूण संख्या 4,789! मृतांचा आकडा 124 वर!

एमपीसी न्यूज – भारतात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 508 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील आतापर्यंतच्या कोरोनाबाधितांची संख्या 4 हजार 789 झाली आहे. कोरोनाबाधित मृतांचा आकडा 124 पर्यंत पोहचला आहे. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने आज (मंगळवारी) संध्याकाळी सहसचिव लव अग्रवाल यांनी ही अधिकृत माहिती दिली. देशात सध्या 4 हजार 312 सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. आतापर्यंत 352 रुग्ण उपचारांनंतर कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत.

‘कोविड 19 इंडिया डॉट ऑर्ग’ या वेबसाईटवर भारतातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 4 हजार 917 दाखविण्यात आला आहे. ही खासगी वेबसाईट असली तर देशातील प्रत्येक जिल्ह्यातील ताजी माहिती अपडेट करण्यात येते, असा या वेबसाईटचा दावा आहे. या वेबसाईटवरील आकडेवारीनुसार भारतात एकूण 4 हजार 389 सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण आहेत. आतापर्यंत 387 रुग्ण बरे झाले आहेत तर 141 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रात एकूण 891 कोरोनाबाधित रुग्ण असून त्यापैकी 55 जणांचा मृत्यू झाला असून 70 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात अजून 766 कोरोनाबाधित विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत, असे या वेबसाईटच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.