New Delhi: देशात एका दिवसात 542 नवे रुग्ण, सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 3219!

एमपीसी न्यूज – भारतात आज (रविवार) दिवसभरात कोरोनाचे 542 नवे रुग्ण आढळले तर नवीन 20 मृतांची नोंद झाली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार देशात सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 3,219 असून 274 रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. देशातील कोरोनाबाधित मृतांचा एकूण आकडा 83 आहे.

कोविड 19 इंडिया डॉट ऑर्ग या वेबसाईटवरील आकडेवारीनुसार भारतातील कोरोनाधितांची एकूण संख्या 4,224 असून त्यापैकी 3,784 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. देशात आतापर्यंत 321 जण कोरोनामुक्त झाले आहेत तर कोरोनाबाधित मृतांचा आकडा 119 वर जाऊन पोहचला आहे.

प्रमुख कोरोनाबाधित राज्यातील रुग्णांची व मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

महाराष्ट्र – 748 (45)

तमिळनाडू – 571 (5)

दिल्ली – 503 (7)

केरळ – 314 (8)

तेलंगणा – 302 (11)

उत्तरप्रदेश – 278 (3)

राजस्थान – 260 (1)

आंध्रप्रदेश – 252 (1)

मध्यप्रदेश – 193 (12)

कर्नाटक – 151 (4)

गुजरात – 128 (11)

जम्मू काश्मीर – 106 (2)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.