New Delhi: देशात कोरोनाबाधितांची संख्या 5,865, बळींचा आकडा 169 वर!

एमपीसी न्यूज – भारतात गेल्या 24 तासांत कोरोनाचे नवे 591 रुग्ण आढळले तर कोरोनाबाधित 20 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 5,865 वर मृतांची संख्या 169 वर जाऊन पोहचली आहे.

केंद्र शासनाच्या आरोग्य मंत्रालयाने आज (गुरुवारी) संध्याकाळी ही अधिकृत आकडेवारी जाहीर केली आहे. देशात आतापर्यंत 478 जण कोरोनामुक्त झाले असून सध्या सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 5 हजार 218 झाली आहे.

कोरोनाबाधित राज्यांमध्ये महाराष्ट्र हा सर्वाधिक प्रभावीत आहे. महाराष्ट्रात मुंबईत सर्वाधिक रुग्ण असून त्या खालोखाल पुण्याचा क्रमांक लागतो.  तमिळनाडू, दिल्ली, तेलंगणा, केरळ, उत्तरप्रदेश, आंध्र प्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश आदी राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीय आहे.

‘कोविड 19 इंडिया डॉट ऑर्ग’ या वेबसाईटवर उपलब्ध आकडेवारीनुसार, भारतातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 6 हजार 276 वर पोहचली आहे. त्यापैकी 5 हजार 519 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. आतापर्यंत 571 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून 186 रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.