New Delhi: देशात नवे 918 रुग्ण, कोरोनाबाधितांची संख्या 8,447 तर मृतांची संख्या 273 वर

एमपीसी न्यूज – गेल्या 24 तासांत भारतात कोरोनाचे नवे 918 रुग्ण आढळले असून कोरोनोबाधित 31 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 8,447 वर पोहचली आहे. कोरोनाबाधित मृतांची संख्या 273 पर्यंत वाढली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने ही अधिकृत आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. 

देशात उपचारांनंतर आतापर्यंत 765 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 7,409 झाली आहे, असे आरोग्य मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले.  महाराष्ट्राच्या पाठोपाठ दिल्लीनेही एक हजार कोरोनाबाधित रुग्णांचा टप्पा ओलांडून देशात दुसरे स्थान मिळविले आहे. तमिळनाडू तिसऱ्या क्रमांक आहे. सुरूवातीला दुसऱ्या क्रमांकावर असणारे केरळ राज्य आता दहाव्या क्रमांकावर गेले आहे.

प्रमुख कोरोनाबाधित राज्यांमधील रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात मृतांचा आकडा दिला आहे.

महाराष्ट्र – 1,761 (127)

दिल्ली – 1,069 (19)

तमिळनाडू – 969 (10)

राजस्थान – 700 (3)

मध्यप्रदेश – 564 (36)

तेलंगणा – 504 (9)

उत्तरप्रदेश – 452 (5)

गुजरात – 432 (22)

आंध्रप्रदेश – 381 (6)

केरळ – 374 (2)

कर्नाटक – 226 (6)

जम्मू काश्मीर – 224 (4)

हरियाना – 185 (3)

पंजाब – 151 (11)

पश्चिम बंगाल – 134 (5)

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.