New Delhi : दिल्लीकरांची सलग तिसऱ्यांदा ‘आप’ला पसंती ; आम आदमी पार्टीची मुसंडी

एमपीसी न्यूज- संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या हाती येत असलेला निकालाचा कल पाहता पुन्हा एकदा दिल्लीकरांनी ‘आम आदमी पार्टी’ला पसंती दिली असल्याचे पाहायला मिळत आहे.  70 जागांपैकी हाती आलेल्या निकालांचा कल पाहता ‘आप’ची 63 जागांवर आघाडी घेतली आहे. यातील पाच उमेदवार यांचे निकाल जाहीर झाले आहेत. मात्र, या निवडणुकीत भाजपची स्थिती सुधारली असून भाजपने मुसंडी मारत 7 जागांपर्यंत मजल मारली आहे. मात्र, काँग्रेसला अद्याप भोपळाही फोडता आलेला नाही.

दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये तिसऱ्यांदा ‘आम आदमी पार्टी’ सत्तेवर येणार असून पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार असल्याचे निश्चित झाले आहे.

_MPC_DIR_MPU_II

निवडणुकीचा ताजा कल-

# आप 63 भाजप 7 काँग्रेस 0.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.