New Delhi : केंद्र सरकारची कोरोना रूग्णांना डिस्चार्ज देण्यासंदर्भात नवीन नियमावली

एमपीसी न्यूज- केंद्र सरकारच्या नव्या नियमावलीनुसार कोरोना रूग्णांना डिस्चार्ज देण्यासंदर्भात नवीन नियमावली अवलंबण्यात येणार आहे. या नियमावली नुसार कोरोना रूग्णांना डिस्चार्ज देण्यासंदर्भात काही बदल करण्यात आले आहेत.

यापूर्वी लक्षणे नसलेल्या तसेच मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांची कोवीड चाचणी निगेटिव्ह आल्यानंतरच डिस्चार्ज दिला जायचा. तसंच गंभीर रूग्णांच्या डिस्चार्जसाठी त्यांचे 2 रिपोर्ट निगेटिव्ह येणं गरजेचे होते, ते आता एक रिपोर्ट वर आणण्यात आले आहे, तसेच होम क्वारंटाईनचा कालावधीही 14 दिवसांवरून 7 दिवसांवर आणण्यात आला आहे.

1) लक्षणे नसलेल्या रूग्णांसाठी
# लक्षणे नसलेल्या कोवीड रूग्णांना सातव्या, आठव्या आणि नवव्या दिवशीही ताप नसल्यास त्याला दहाव्या दिवशी डिस्चार्ज देण्यात यावा व यासाठी कोवीड चाचणी करण्याची गरज नाही

# मात्र डिस्चार्जनंतर या रूग्णास सात दिवस होम क्वारंटाईन गरजेचे राहील.

# डिस्चार्ज देण्यापूर्वी ऑक्सीजनचे प्रमाण 95 टक्के पेक्षा कमी आढळल्यास, त्या व्यक्तीला ‘डेडिकेटेड कोविड सेंटर’ मध्ये दाखल करावे.

3) मध्यम लक्षणे असणारे रुग्ण
# रुग्णांमधील ताप तीन दिवसांत कमी झाला असेल तर पुढील चार दिवस ऑक्सिजनचे प्रमाण 95 टक्के पेक्षा जास्त असेल अशा रुग्णांना लक्षणे सुरु झाल्यापासून 10 दिवसांनंतर डिस्चार्ज देण्यात यावा, या रुग्णांना डिस्चार्ज करतांना पुन्हा कोविड चाचणीची गरज नाही

# डिस्चार्जनंतर सात दिवस होम क्वारंटाईन राहणे गरजेचे असणार आहे

3) गंभीर रुग्णांसाठी
# रुग्णांमध्ये लक्षणे दिसणे बंद झाले असेल आणि त्यांचा कोविड चाचणीचा एक रिपोर्ट निगेटीव्ह आला असेल तरच त्याला डिस्चार्ज दिला जावा
# रुग्णांची कोवीड चाचणी लक्षणे कमी झाल्यानंतरच करण्यात येईल.
# रुग्णांना लक्षणे आढळल्यापासून डिस्चार्ज देईपर्यंतचा कालावधी हा किमान 10 दिवसांचा असावा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.