New Delhi News : पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच 17 खासदार कोरोना पाॅझिटिव्ह

खासदारांची 13 आणि 14 सप्टेंबर रोजी कोरोना‌ चाचणी करण्यात आली होती.

0

एमपीसी न्यूज – आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. मात्र, अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच 17 खासदारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे.

खासदारांची 13 आणि 14 सप्टेंबर रोजी कोरोना‌ चाचणी करण्यात आली होती. या चाचणीत 17 खासदारांचे कोरोना अहवाल सकारात्मक आले आहेत.

बाधित कोरोना खासदारांमध्ये सर्वाधिक 12 खासदार भारतीय जनता पक्षाचे आहेत. YRS चे दोन, शिवसेना, DMK आणि RLP यांचा एक-एक खासदारांचा समावेश आहे.

पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी सर्व खासदारांना कोरोना चाचणी करणे बंधनकारक होते. तसेच चाचणी केली असेल तर त्या चाचणीला 72 हून अधिक काळ झालेला नसवा, असेही स्पष्ट करण्यात आले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.