New Delhi News : फेक ‘को-विन’ ॲप्सपासून सावध राहा-आरोग्य मंत्रालय
एमपीसी न्यूज: भारत सरकारने कोविडशील्ड आणि कोवॅक्सीन या लसींना मंजूरी दिली आहे. ह्या लसी मिळवण्याकरता को-विन (कोविड वॅक्सीन इंटेलिजन्स नेटवर्क) या ॲपवर नोंदणी करणे सरकारने बंधनकारक केले आहे. ह्या ॲपचे काम अजूनही चालू असून ते डाऊनलोड करण्यासाठी सरकारने उपलब्ध केलेले नाही. पण अशा नावाची अनेक बनावट ॲप्स प्ले स्टोअरवर आलेली आहेत. त्यापासून नागरिकांनी सावधान राहावे, असे आरोग्य मंत्रालयाने केले आहे.
या ॲपवर नोंदणीकरण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, बॅंक खातेपुस्तिका अशा ओळखपत्रांची गरज लागणार आहे. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
ह्या ॲपची अधिकृत घोषणा आरोग्य विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर करण्यात येईल.
तसेच अशा प्रकारचे इतर कोणतेही ॲप नागरिकांनी डाऊनलोड करून त्यात आपली वैयक्तिक माहिती दाखल करू नये, असेही आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
हे ॲप गुगल प्ले स्टोअरवर आणि आयओएस स्टोअरवर मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.