New Delhi News : कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांना कोरोनाची लागण 

एमपीसी न्यूज – कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांना कोरोनाची लागण झाली आहे. राहुल गांधी यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली. सौम्य लक्षणं आढळल्यानंतर चाचणी केली असता करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. 

राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ‘सौम्य लक्षणं जाणवल्यानंतर माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. नुकतेच माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कृपया सुरक्षेच्या सर्व नियमांचं पालन करा. सुरक्षित राहा’.

_MPC_DIR_MPU_II

दरम्यान, कोरोनाचा कहर वाढत असल्याने पश्चिम बंगालमधील आपल्या सर्व सभा रद्द करत असल्याची घोषणा राहुल गांधी यांनी केली होती. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना देखील कोरोनाची बाधा झाली असून, ते दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.