New Delhi News: जीएसटी उत्पन्नात चार टक्के वाढ! सप्टेंबरमध्ये 95480 कोटी रुपयांचा जीएसटी महसूल जमा

एमपीसी न्यूज – सप्टेंबर 2020 मध्ये जीएसटीच्या माध्यमातून एकूण 95,480 कोटी रुपये उत्पन्न शासनाला मिळाले आहे. सप्टेंबर 2019 च्या तुलनेत ते चार टक्क्यांनी अधिक आहे.

सप्टेंबर 2020 मध्ये एकूण 95,480 कोटी रुपये वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) महसूल संकलित करण्यात आला, यामध्ये सीजीएसटी 17,741 कोटी रुपये, एसजीएसटी 23,131 कोटी रुपये, आयजीएसटी 47,484 कोटी रुपये (वस्तूंच्या आयातीवर संकलित 22,442 कोटी रुपये सह) आणि सेस 7,124 कोटी रुपये (वस्तूंच्या आयातीवर संकलित 788 कोटी रुपये सह) समावेश आहे.

सरकारने आयजीएसटी मधून सीजीएसटीला 21,260 कोटी रुपये आणि एसजीएसटीला 16,997 कोटी रुपये नियमित सेटलमेंट म्हणून, दिले आहेत. सप्टेंबर 2020 मध्ये नियमित सेटलमेंट नंतर केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी मिळवलेला एकूण महसूल सीजीएसटीसाठी 39,001 कोटी रुपये आणि एसजीएसटीसाठी 40,128 कोटी रुपये आहे.

मागील वर्षी याच महिन्यातील जीएसटी महसुलापेक्षा सप्टेंबर 2020 चा महसूल 4% जास्त आहे. सप्टेंबर 2020 मध्ये वस्तूंच्या आयातीमधून मिळालेला महसूल गेल्या वर्षीच्या याच कालावधीत मिळालेल्या महसुलाच्या 102% होता आणि देशांतर्गत व्यवहाराद्वारे (सेवांच्या आयातीसह) मिळालेला महसूल 105 % होता.

State CodeState Name
Sep,19Sep,20Growth
1Jammu and Kashmir28236830%
2Himachal Pradesh6096537%
3Punjab113311945%
4Chandigarh157141-10%
5Uttarakhand101710655%
6Haryana4110471215%
7Delhi33863146-7%
8Rajasthan2253264717%
9Uttar Pradesh507350750%
10Bihar9869961%
11Sikkim209106-49%
12Arunachal Pradesh4435-20%
13Nagaland212943%
14Manipur4234-19%
15Mizoram2917-42%
16Tripura5250-3%
17Meghalaya106100-6%
18Assam8489128%
19West Bengal325533934%
20Jharkhand1509165610%
21Odisha2015238418%
22Chattisgarh1490184124%
23Madhya Pradesh208721764%
24Gujarat574160906%
25Daman and Diu8915-83%
26Dadra and Nagar Haveli12522579%
27Maharastra13579135460%
29Karnataka63506050-5%
30Goa311240-23%
31Lakshadweep21-58%
32Kerala1393155211%
33Tamil Nadu5616645415%
34Puducherry149148-1%
35Andaman and Nicobar Islands19192%
36Telangana28542796-2%
37Andhra Pradesh198521418%
38Ladakh090%
97Other Territory132110-16%
99Center Jurisdiction35121247%
Grand Total69091722505%

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.