New Delhi News : केंद्र सरकारी नोकऱ्यांसाठी 21 नव्या खेळप्रकारांचा समावेश

एमपीसी न्यूज – केंद्र सरकारच्या विविध विभागात तसेच मंत्रालयात क्रीडा कोट्यातून दिल्या जाणाऱ्या नोकऱ्यांसाठी 21 नव्या खेळप्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री किरण रिजीजू यांनी राज्यसभेत याबाबत माहिती दिली.

भारत सरकारच्या विविध विभागांत तसेच मंत्रालयांमध्ये ‘क’ गटातील कोणत्याही पदावर नेमणुकीसाठी, क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्ती पात्र ठरण्यासाठी ग्राह्य धरण्यात येते. यासाठी क्रीडा प्रकारांच्या यादीत सरकारने आता ‘मल्लखांब’ आणि ‘सेपाक टकराव’ यांसह एकूण 21 नव्या क्रीडाप्रकारांचा समावेश केला आहे.

यामध्ये बेसबॉल, बॉडी बिल्डिंग, सायकल पोलो, डिफ स्पोर्ट्स, फेंसिग, कुडो, मल्लखांब, मोटार स्पोर्ट्स, नेट बॉल, पॅरा स्पोर्ट्स, शुटिंग बॉल, रोल बॉल, रग्बी, सेपाक टकराव, पेनॅक सेलाट, सॉफ्ट टेनिस, टेनपिन बॉलिंग, ट्रायल्थलॉन, टग ऑफ वॉर, वुशू, टेनिस बॉल क्रिकेट या खेळांचा समावेश करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.