New Delhi News : पत्रकार निधी राजदान ठरल्या फिशींग हल्ल्याच्या बळी

एमपीसी न्यूज: पत्रकार निधी राजदान यांची हार्वर्ड विद्यापीठातील नोकरीच्या नावाखाली फसवणूक झाली आहे. त्यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे.

हार्वर्ड विद्यापीठात ‘असोसिएट प्रोफेसर’ या पदावर नोकरी करण्याची संधी मिळत असल्याचे त्यांनी 2020 मध्ये समाजमाध्यमांवर सांगितले होते. यासाठी त्यांनी ‘एनडीटीव्ही’मधील 21 वर्षांची नोकरी सोडली होती.

सर्वांत प्रथम सप्टेंबर 2020 मध्ये हार्वर्डमधील वर्ग सुरू होतील, असे निधी यांना सांगण्यात आले. पुढे कोरोना परिस्थितीमुळे हे वर्ग जानेवारी 2021 मध्ये भरतील, असे सांगितले गेल्याचे निधी यांनी सांगितले. तसेच येणा-या मेलमध्ये मला प्रशासकीय विसंगती आढळून आली. या काही आक्षेपार्ह बाबी आढळून आल्यानंतर मी हार्वर्डच्या वरिष्ठ अधिका-यांशी संपर्क साधला.

त्यांनी मला विद्यापीठाकडून आलेली माहिती, मेल शेअर करण्यास सांगितले. हे मेल त्यांनी तपासल्यानंतर मी फिशींग हल्ल्याची बळी ठरल्याचे समजले. प्रत्यक्षात हार्वर्डकडून मला ही ऑफर देण्यात आलीच नव्हती. माझा वैयक्तिक डाटा, डिव्हाईस आणि समाजमाध्यमांवरील अकाऊंट्सचा आधार घेऊन माझी फसवणूक केल्याचे निधी यांनी सांगितले.

हा प्रकार लक्षात आल्यानंतर निधी यांनी पोलीसांकडे तक्रार दिली असून त्यांना सर्व ई-मेल्सचे पुरावे दिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.