pune News : कोरोना संकट काळात महापालिकेला राज्य शासनाची मदत नाही

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर झाले आहे. वारंवार मागणी करूनही राज्य शासनाने महापालिकेला काहीही आर्थिक मदत केली नाही. दरम्यान, पुण्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासदार गिरीश बापट यांनीही लोकसभेत आवाज उठविला आहे. या प्रश्नी केंद्र सरकारने लक्ष देण्याची बापट यांनी मागणी केली आहे.

पुणे महापालिकाच कोरोना विरोधातील लढाई लढत आहे. शहरात रोज कोरोनाचे 1500 ते 2 हजार रुग्ण वाढत आहेत. शहरात कोरोनाचे 1 लाख 37 हजार 330 रुग्ण झाले आहेत. त्यामध्ये 1 लाख 16 हजार रुग्णांनी वेळीच उपचार घेऊन कोरोनावर मात केली आहे.

सध्या 17 हजार 449 ॲक्टिव्ह रुग्ण असून, 3 हजार 255 नागरिकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. पुण्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासदार गिरीश बापट यांनीही लोकसभेत आवाज उठविला आहे. केंद्र सरकारने लक्ष देण्याची बापट यांनी मागणी केली आहे.

मागील 6 ते 7 महिन्यापासून पुण्यात कोरोनाचे संकट अतिशय गंभीर झाले आहे. महापालिकेच्या उत्पन्नावरही परिणाम झाला आहे. शहरातील विकासकामे बंद आहेत.

केवळ कोरोनाच्या उपाययोजना करण्यासाठी खर्च सुरू आहे. राज्य शासनाकडून आर्थिक मदत मिळावी, यासाठी महापालिकेतर्फे दोन प्रस्ताव पाठविण्यात आले आहे. मात्र, काहीही आर्थिक मदत मिळाली नाही.

दरम्यान, जम्बो रुग्णालयासाठी राज्य सरकारच्या हिश्श्यापेक्षा अधिक खर्च महापालिकेला करावा लागत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडे दोनशे कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली आहे, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.