22.4 C
Pune
मंगळवार, ऑगस्ट 9, 2022

New Delhi News : नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती आता ‘पराक्रम दिवस’ म्हणून होणार साजरी

spot_img
spot_img

एमपीसी न्यूज: सुभाषचंद्र बोस यांची जयंती यापुढे ‘पराक्रम दिवस’ म्हणून साजरी करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने दिली आहे. दरवर्षी 23 जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी केली जाते.

23 जानेवारी 2021 रोजी नेताजींची 125 वी जयंती आहे. नेताजींनी देशाची नि:स्वार्थपणे सेवा केली आहे. त्यांचे देशाप्रती असलेले महान कार्य लक्षात ठेवण्यासाठी त्यांचा जन्मदिवस ‘पराक्रम दिवस’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे.

देशातील तरुणांना नेताजींच्या जीवनकार्यातून प्रेरणा मिळेल आणि त्यांच्यात देशभक्ती आणि साहसाची भावना निर्माण होईल, यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे सांस्कृतिक मंत्रालयाने सांगितले आहे.

पश्चिम बंगालमध्ये लवकरच विधानसभा निवडणूका येऊ घातल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 जानेवारीस सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त कोलकात्यात जाणार असून ते नेताजी सुभाष मेमोरिअल संग्राहालयाचे उद्घाटन करणार आहेत.

spot_img
Latest news
Related news