22.2 C
Pune
मंगळवार, ऑगस्ट 16, 2022

New Delhi News : शरद पवार यांना प्राप्तीकर विभागाची नोटीस; निवडणूक पत्राबाबत स्पष्टीकरणाची मागणी

spot_img
spot_img

एमपीसीन्यूज : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज, पत्रकार परिषद घेत प्राप्तिकर विभागाकडून त्यांना देण्यात आलेल्या नोटिशीची माहिती दिली. तसेच आता सुप्रिया सुळे यांनाही नोटीस येणार असल्याचे समजते. लवकरच या नोटिशीला उत्तर देणार असल्याची माहितीही पवार यांनी यावेळी दिली.

सन 2009, 2014 आणि 2019 या निवडणुकीत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राबाबत आपल्याला नोटीस देण्यात आली आहे. तसेच निवडणूक आयोगाच्या सांगण्यावरुन ही नोटीस आपल्याला देण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले. या नोटिशीला लवकरच उत्तर देईन, असेही पवार यावेळी म्हणाले.

आधी मला नोटीस आली. आता सुप्रियालाही नोटीस मिळणार असल्याचे समजते. देशातील इतक्या सदस्यांपैकी आमच्यावर विशेष प्रेम आहे याचा आनंद असल्याचा टोला लगावत या नोटिशीत काही बाबतीत स्पष्टीकरण मागविण्यात आल्याची माहिती शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दरम्यान, शरद पवार यांना प्राप्तिकर विभागाकडून नोटीस आल्याची माहिती त्यांनी स्वतः माध्यमांना दिल्यानंतर खळबळ उडाली आहे. तसेच या वृत्तानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटातही अस्वस्थता निर्माण झाली आहे.

spot_img
Latest news
Related news