New Delhi News : रोबोट करणार विमानाची अंतर्गत स्वच्छता

एमपीसी न्यूज: एअर इंडिया एक्सप्रेसने त्यांच्या विमानांमधील आतील भाग स्वच्छ व निर्जंतुक करण्यासाठी रोबोटीक तंत्रज्ञान पुढे आणले आहे. अशा प्रकारे विमानांच्या आतून स्वछता व निर्जंतुकीकरणासाठी रोबोटीक तंत्रज्ञान वापरणारी एअर इंडिया एक्सप्रेस देशातील पहिली विमान कंपनी ठरली आहे.

हे रोबोटीक मशीन आसने, आसनांखालील भाग, डोक्यावर असलेल्या सामान ठेवण्याच्या कप्प्यातील भाग, खिडक्या, कॉकपीट इंस्ट्रूमेंटेशनचा भाग, डोक्यावरील स्विचचे पॅनल अशा भागांचे निर्जंतुकीकरण करणार आहे.

अशा प्रकारे विमानांच्या आतून स्वछता व निर्जंतुकीकरणासाठी रोबोटीक तंत्रज्ञान वापरणारी एअर इंडिया एक्सप्रेस देशातील पहिली विमान कंपनी ठरली आहे.

या रोबोटमध्ये अल्ट्रावॉयलेट निर्जंतुकीकरण लॅंपिंगसह एक अल्ट्रावॉयलेट मशीन बसवण्यात आले आहे. हे तंत्रज्ञान रसायनमुक्त व पर्यावरणपूरक आहे. या तंत्रज्ञानाला नॅशनल एक्रिडिटेशन बोर्ड फॉर टेस्टिंग ॲन्ड कॅलिब्रेशन लॅबोरेटरीजने (NABL) मान्यता दिली आहे.

एनएबीएल ही देशभरातील वेगवेगळ्या प्रयोगांची, तंत्रज्ञानांची क्षमता, गुणवत्ता तपासून पाहणारी भारतीय सरकारची मान्यताप्राप्त संस्था आहे. एअर इंडिया एक्सप्रेस त्यांच्या इतर विमानतळांवरही या तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.