22.8 C
Pune
मंगळवार, ऑगस्ट 9, 2022

New Delhi News : लॅंडलाईनवरून मोबाईलवर कॉल करताना आजपासून झाला ‘हा’ बदल

spot_img
spot_img

एमपीसी न्यूज: आजपासून (दि. 15 जानेवारी) लॅंडलाईनवरून मोबाईल क्रमांकावर कॉल करण्याचा नियम बदलला आहे. यापुढे लॅंडलाईनवरून मोबाईल क्रमांक डायल करण्यापूर्वी शून्य लावणे बंधनकारक झाले आहे.

केंद्रीय दूरसंचार विभागाने टेलिकॉम कंपन्यांना नव्या प्रणालीची अंमलबजावणी करण्यासाठी मुदत दिली होती.

2020 मध्ये भारतीय दूरसंचार नियामक मंडळाने (TRAI) मोबाईल क्रमांकाच्या आधी शून्य क्रमांक लावण्याची शिफारस केली होती. त्यानंतर दूरसंचार विभागाने हा प्रस्ताव मान्य केला होता. त्यामुळे 15 जानेवारी 2021 पासून लॅंडलाईनवरून शून्य दाबणे बंधनकारक झाले आहे.

या बदलामुळे विविध दूरसंचार कंपन्यांना फायदा होणार असून त्यांना जवळपास 253.9 कोटींच्या आसपास अतिरिक्त क्रमांक बनवता येणे शक्य होणार आहे.

विविध टेलिकॉम कंपन्या आपल्या लॅंडलाईन ग्राहकांना या नवीन बदलाचे संदेश पाठवून त्यांना जागरूक करण्याचे काम करत आहेत. असे असले तरी लॅंडलाईनवरून लॅंडलाईन किंवा मोबाईलवरून लॅंडलाईनवर फोन करण्याच्या पद्धतीत बदल झालेला नाही.

 

spot_img
Latest news
Related news